निजामशाहीतील प्रसिद्ध राज्यकर्ती स्त्री चांदबीबी हिचा खून कोणी व कधी केला?

चांदबिबी हि हुसेन निजामशहा आणि खुनजा हुमायून यांची कन्या होती.कर्तबगार आईच्या पोटी जन्मलेली चांदबिबी पुढे राज्यकर्ती झाली. आईकडून तिनं राज्यकारभाराचे गुण घेतले होते.

विजापूरची आदिलशाही व अहमदनगरच्या निजामशाहीमध्ये सत्ता संघर्ष होता.

निजामशाही व आदिलशाहीमध्ये शांततेचा करार व्हावा, यासाठी चांदबिबीचा निकाह विजापुरच्या आदिलशहाशी लावला गेला. लग्नानंतर ती पतीला राज्यकारभारत मदत करू लागली. अली आदिलशहाच्या राज्यकारभारात अनेक छोटे मोठे टोळ्याचे संघर्ष सुरू होते. या टोळी जमातींच्या नायकाशी चांदबिबीने शांततेचे करार करत शांतता प्रस्थापित केली.

अली आदिलशाह १५८०मध्ये वारला तिला. त्यांना मूल नव्हते. तिने भावाचा मुलगा इब्राहिमला दत्तक घेऊन राज्यकारभार चालवला. विजापूर दरबारात सरदारांची कटकारस्थाने सुरू होती, परिणामी तिला अटक करून सातारच्या किल्ल्यामध्ये कैद केलं गेलं. तरुण इब्राहिम शहा सिकंदर खानच्या तावडीतून मुक्त झाल्यानंतर त्यानं आई चांदबिबीला सातारच्या किल्ल्यातून सोडवून राज्याची जबाबदारी पुन्हा तिच्यावर सोपवली. इकडे विजापूरच्या दरबारात हबशी सरदार आणि दखनी सरदार यांच्यात भांडणे सुरू झाली होती.

.इ. स.१५९९ मध्यें मोगल शहजादा दानियल हा पुन्हां अहमदनगरावर चालून आला. त्यावेळीं चांदबिबीनें कोणाही दरबारी इसमावर विश्वास न ठेवतां आपल्या स्वत:च्या विचारानें या आलेल्या संकटाचा परिहार करण्याचा संकल्प केला. पण मोंगली सैन्य प्रचंड असल्यामुळें त्याशीं टक्कर देण्याचें सामर्थ्य निजामशाही सैन्यांत बिलकुल राहिलें नव्हतें. तेव्हां चांदबिबी हिनें युक्तीनें तह करून, बालवयात आलेल्या बादशहासह जुन्नरास जाण्याचा विचार मनांत आणिला. परंतु निजामशाही सरदारांमध्येच दुफळी होऊन त्यांनीं चांदबिबीवर छुपा हल्ला करण्याचा निर्णय घेतला व इकडे किल्ल्याच्या बाहेर मोंगल सैन्याशीं लढाई चालू असतांच हमीदखान नामक एका पठाण सरदारानें तिचा अहमदनगर किल्ल्याच्या राजवाड्यांत खून केला ( सन १५९९ ).⁠⁠⁠⁠

Comments

Popular posts from this blog

मुघलांचा इतिहास तर माहिती आहे पण आदिलशाह आणि निजाम कोठून आले आणि दक्षिणेत त्यांनी आपले राज्य कसे प्रस्थापित केले?

अहमदनगरचा भुईकोट किल्ला

ख्वाजा गरीब नवाज का इतिहास