Posts

Showing posts from June, 2021

निजामकालीन अंबाजोगाई

Image
निजामकालीन अंबाजोगाई न्यायालय ई.स.१८८४ ला सर्वप्रथम अंबाजोगाईत न्यायालय चालू झाली. ही न्यायालये खोलेश्वर मंदिराच्या जवळ जिथे शाह बुरुज आहे तिथे सुरू झालीत. निजामाच्या काळात राज्यात पहिले जायद निजामत कोर्ट नावाने जिल्हा व इतर न्यायालय खोलेश्वर मंदिराच्या सभागृहात कोर्ट म्हणून चालत असे. इथेच बाजूला तहसील ऑफिस पण होते. आजचे अंबाजोगाई म्हणजे केज व धारूर मिळून असलेले तालुक्याचे ठिकाण होते. तब्बल ३९२ खेडे असलेले हे निजाम संस्थानातील दुसऱ्या क्रमांकाचे तालुक्याचे ठिकाण होते. आपल्या पेक्षा मोठे निजामाबाद हे तालुक्याचे ठिकाण होते. निजामबाद मध्ये तब्बल ४१२ खेडी होती. अंबाजोगाई हे दुसरे मोठे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे निजामानीं येथे जिल्हा न्यायालय पण दिले होते. पुढे स्वातंत्र्यानंतर बीड जिल्हा झाल्यामुळे जिल्हा न्यायालय जिल्ह्याच्याच ठिकाणी असावे म्हणून ते अंबाजोगाईतुन बीडला हलविले. आता जिथे नवीन कोर्टाचे बांधकाम चालू आहे तिथे १९१२ ला जिल्हा व इतर न्यायालय सुरु झाले तीच ही फोटोत दिसणारी ऐतिहासिक इमारत जी २०१२ मध्ये पाडण्यात आली. नंतर आज जिथे बस स्टँड आहे त्याच्या समोर १९१२ ला भव्य अ...