निजामकालीन अंबाजोगाई
निजामकालीन अंबाजोगाई
न्यायालय
ई.स.१८८४ ला सर्वप्रथम अंबाजोगाईत न्यायालय चालू झाली. ही न्यायालये खोलेश्वर मंदिराच्या जवळ जिथे शाह बुरुज आहे तिथे सुरू झालीत. निजामाच्या काळात राज्यात पहिले जायद निजामत कोर्ट नावाने जिल्हा व इतर न्यायालय खोलेश्वर मंदिराच्या सभागृहात कोर्ट म्हणून चालत असे. इथेच बाजूला तहसील ऑफिस पण होते.
आजचे अंबाजोगाई म्हणजे केज व धारूर मिळून असलेले तालुक्याचे ठिकाण होते. तब्बल ३९२ खेडे असलेले हे निजाम संस्थानातील दुसऱ्या क्रमांकाचे तालुक्याचे ठिकाण होते. आपल्या पेक्षा मोठे निजामाबाद हे तालुक्याचे ठिकाण होते. निजामबाद मध्ये तब्बल ४१२ खेडी होती. अंबाजोगाई हे दुसरे मोठे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे निजामानीं येथे जिल्हा न्यायालय पण दिले होते. पुढे स्वातंत्र्यानंतर बीड जिल्हा झाल्यामुळे जिल्हा न्यायालय जिल्ह्याच्याच ठिकाणी असावे म्हणून ते अंबाजोगाईतुन बीडला हलविले. आता जिथे नवीन कोर्टाचे बांधकाम चालू आहे तिथे १९१२ ला जिल्हा व इतर न्यायालय सुरु झाले तीच ही फोटोत दिसणारी ऐतिहासिक इमारत जी २०१२ मध्ये पाडण्यात आली.
नंतर आज जिथे बस स्टँड आहे त्याच्या समोर १९१२ ला भव्य असे तहसील कार्यालय व कोषागार कार्यलय बांधण्यात आले.
न्यायालयात येणाऱ्या लोकांसाठी पाण्याची सोय व्हावी म्हणून न्यायलयांच्या आवारात सुंदर दंगडी बांधकाम केलेली विहीर आज पण दिसते त्याला भरपूर पाणी पण आहे.
निजामकालीन अंबाजोगाई कोर्टात म्हणजे १९४५ च्या जवळपास ८० वकील वकिली करायचे. त्यामध्ये Adv. जनार्धनराव देशपांडे, वासुदेवराव दसगावकर, श्रीधरपंत सोमण, लक्ष्मणराव भालचंद्र, विनायकराव कन्नडकर, नारायणराव जोशी, एस.आर.नागापूरकर, आर.एस.देशपांडे व भावठाणकर हे दिवाणी प्रकरणा मध्ये तज्ञ वकील होते. तसेच Adv. मीर गजनफरअली उस्मानी, मन्मथअप्पा चौधरी, रामचंद्र देशपांडे परळीकर हे फौजदारी प्रकरणामध्ये तज्ञ वकील म्हणून काम करत होते.
या सुसंस्कृत अंबाजोगाई ने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मा. सुधाकरराव कुर्डुकर साहेब, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती मा.व्यकटरावजी देशपांडे साहेब, माजी न्यायमूर्ती मा.एस जे देशपांडे साहेब, माजी न्यायमूर्ती मा. अंबादास जोशी साहेब, न्यायमूर्ती मा.रवींद्र बोर्डे साहेब दिलेली आहेत.
असा हा अंबाजोगाईचा निजामकालीन न्यायलयांचा इतिहास आहे...
Source: Mujeeb Kazi Sir
Aambajogai.com #Ambajogai #Ambajogaikar
Comments
Post a Comment