गडकरी म्हणतात, 'पाच हजार वर्षात एकही हिंदू राजाने मशीद पाडली नाही.' पाच हजार वर्षांपूर्वी हिंदू धर्म अस्तित्वात होता का?
हिंदू धर्म म्हणजे भारतातील विविध आणि प्रसंगी परस्परविरोधी अशा स्थानिक धर्मशास्त्र, रुढी, आध्यात्मिक संकल्पना आदिंचा अव्याहत प्रवाह. इष्ट देवतांत बदल झाला असेल, रुढी कालानुरूप बदलल्या असतील, किंबहुना बदलाव्याच; पण आठवणी आहेत, ती परंपरा, तो प्रवाह आजही आहे. गंगोत्रीही गंगाच आणि प्रयागीही गंगाच. आता चौदाशे वर्ष जुन्या इस्लामच्या मशिदी पाच हजार वर्षांपूर्वी होत्या की नाहीत ते ज्याने त्याने आपापली बुद्धिमत्ता वापरून पडताळून घ्यावे.
असो.
राहिला विषय हिंदू राजांनी मशिदी पाडण्याचा, तर छत्रपति शिवाजी महाराजांचे निकटवर्तीय कवींद्र परमानंद कृत शिवभारत या ग्रंथातील १८व्या अध्यायातील ५२वा श्लोक असा आहे[1] .
त्वया गृहीत्वा कल्याणं तथा भीमापुरीमपि। यवनानाम् महासिद्धिनिलयाः किल पतिता:।।
अर्थः कल्याण आणि भीमापुरी (भिवंडी) देखील घेऊन आपण यवनांच्या (मुसलमानांच्या) मशिदी जमिनदोस्त केल्या.
आता महाराज हिंदू होते की आणखी काही हे पण ज्याचे त्याने ठरवा.
टीप: "शिवभारत हा ब्राह्मणी/वैदिक/संघी कावा आहे" वगैरे असे कोणी म्हणणाच्या आधीच लिहितो - हा ग्रंथ महाराजांच्याच राज्यात, त्यांच्या हयातीत, त्यांच्याच विश्वासू कवीने लिहिला. आणि महाराजांना बहुदा संस्कृत भाषेचे ज्ञानही होते.
तळटीपा
गडकरी खूप कर्तबगार मंत्री आहेत , त्यांचा आदर ठेवून सांगेन की हिंदू राजांनी इतिहासात मशीद पडल्याचे उदाहरण खूप आहेत.
शिवाजी महाराजांनी मशीद पाडले जे पूर्वाश्रमीचे मंदिर होते, मूळ मशिदी ल पाडलेले उदाहरण नाही
दक्षिण विजय वेळी त्यांनी तामिळनाडू मध्ये तिरुवडी इथिल मशीद जी आधी मंदिर होती ते पाडले.[1] त्याबरोबर मद्रास इथील तिरवांमलाई मधील मूळ शिव मंदिर जे मशीद मध्ये रुपांतरीत झालेले ते महाराजांनी पुन्हा मंदिर मध्ये बदल केला.
त्याशिवाय शिवभारत या ग्रंथामध्ये पण शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी मध्ये मशीद पडल्याचा उल्लेख आहे.
त्याशिवाय मुघल आणि मराठ्यांचा भारतात प्रभाव कमी झाला तेंव्हा रणजितसिंह नी लाहोर मध्ये अने मशीद पडल्या.
महादजी शिंदे यांनी रोहीलेखंद्यात जेंव्हा पानिपत चां सूत्रधार नजीब रोहील्याचया वंशजांना संपवले तेंव्हा तिथली मशीद पाडली. शिवाय मुहम्मद घोरी ने बसवलेली लाहोर मधील मशीद पडली आणि तिथे वापरलेले सोमनाथ मंदिरच्या सोन्याचे दारे आणि वस्तू काढून परत सोमनाथ मंदिर कडे पाठवून दिले.
त्याशिवाय तलिकोत चे जे युद्ध झाले विजयनगरचे हिंदू साम्राज्य संपले त्यात रामाराय ने आधी अनेक मशीद पडले आणि तेच निम्मित धरून सर्व आदिलशाही निजामशाही कुतुबशाही एकत्र आले.त्याशिवाय विजयनगर च आणखी एक राजा सदाशिव राय ने सुद्धा अनेक मशीद पडल्याचे लिहलेले आहे.
तळटीपा
Comments
Post a Comment