छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभारलेलं असतानासुद्धा शहाजीराजे स्वराज्यात न येता बंगलोरमध्येच का थांबले होते?
जयराम पिंड्ये या कवीनेे तर म्हटले होते की, ‘‘इत साहजु है; उत साहजहॉं’’
पृथ्वीचे रक्षण दक्षिणेत शहाजी आणि उत्तरेत शहाजहान करीत आहे.
1630 शहाजी महाराज 1660 शिवाजी महाराज आणि 1688 संभाजी महाराज नी गाजवले.
शहाजी महाराजांचे गणना त्या काळात भारतातली सर्वोत्तम सेनापती मध्य असायचे.
उत्तरेत शहाजहान, दक्षिणेत शहाजी असा शहाजी महाराजांचा नाव भारतात उल्लेखाने घ्यायचे.मलिक अंबर च्या मुशीत तयार झालेले शहाई आपल्याच गुरूला भारी पडले होते.एकाचवेळी मलिक अंबर आणि शहाजी महाराजांनी आदिलशाही मुघालशही पराभूत केलेले.
शहाजी महाराज स्वराज्यात का आले नाही ,बंगलोर का थांबले.याचा इतिहासात स्पष्ट उल्लेख नाही.
पण तात्कालिक परिस्थिती बघता खालील कारणे असू शकती ल
- इतिहासात एक गोष्ट कमी लोकांना माहित आहे की शहाजहान ला शहाजी महाराजांनी आपल्या बापाच्या म्हणजे जहांगीर विरुद्ध बंडात शहाजहान ल मदत केलेली. त्यामुळे निजामशाहीत सोडल्यावर लगेच मुघलांनी त्यांना आपल्या पदरी घेतलेले. पण नंतर शहाजी महाराजांनी मुघालच्य आणि आदिलशाही विरुद्ध निझमचे बंद फसले. तेंव्हा मुघलांनी शहाजी महाराज ना आदिलशाही कडे नोकरीस मान्यता दिलेली आणि एक विशेष अट ठेवलेली होती शहाजी महाराजांना महाराष्ट्रापासून दूर कर्नाटकात ठेवावे.कारण शहाजी महाराज महाराष्ट्रात राहिले तर स्वस्थ बसणार नाही हा शहाजहान ला विश्वास होता आणि ते मुघली सत्तेला घातक होते.त्यांना दक्षिणेत ठेवून आदिलशाही वर एका प्रकारचा वचक पण बसला होता.
- शहाजी महाराजांचा जन्म 1602 आणि मृत्यू 1664 . शिवाजी महाराजांचे वतन म्हणजे पुणे सुपे हे शहाजी महाराजांचे पूर्वापार.शिवाजी महाराजांनी अफजल खान ला 1659 ला मारले.त्यापाठोपाठ शिवाजी महाराजांनी आदिलशाहीचा तिसरा हिस्सा जिंकला आणि तेवढेच सैन्य संपवले.त्यामुळे आदिलशाही ने शहाजी महाराजांनी दुखावले नाही. कारण त्याच वेळी मुख्य आदिलशाह मरण पावला होता. दोन्ही बाजूने उठाव झाला असतात तर आदिलशाही धोक्यात आली असती. पण शहाजी महाराजांनी ओळखले होते की आदिलशाही पेक्षा मुघल हे जास्त मोठे शत्रू होते. त्यामुळे आदिलशाही संपेल अस शहाजी महाराजांनी काही केले नाही.पुढील काळात सुद्धा शिवाजी महाराजांनी किंवा संभाजी महाराजांनी आदिलशाही सबुरीचा धोरण ठेवले कारण मुख्य शत्रू होता मुघल.
- शिवाजी महाराजांनीच केलेले स्वराज्य खरे वाढीस लागले 1670 नंतर. तो पर्यंत म्हणजे 1670 आधी स्वराज्य म्हणजे पुणे सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड सांगली मधील काही भाग.तेवढाच भाग शहाजी महाराज कडे होता. मग इकडे स्वराज्यात आले अस्त तर दक्षिणी कडील भाग म्हणजे बंगलोर वर प्रभुत्व राखणे जमले नसते.
- बंगलोर म्हैसूर हा भाग आढिक सुपीक इथले अनेक छोटे वतनदार शाहजी महाराजांचे मांडलिक . इतके श्रीमंत वतन सोडण्याचे काही कारण नव्हते विशेषतः पुणे सुपे च भाग शिवाजी महाराजांनी चांगलाच वाढवलेला होता.
- शाहजी महाराजांची दोन लग्ने. जिजाबाई आणि तूकाबई.त्यामुळे. तेस्वराज्यात आले असते तर यांच्या मुलामध्ये वाद होण्याची शक्यता झाली असती.
- शाहजी महाराजांचे वाढते वय. शिवाजी महाराजांचा डंका जेंव्हा भारतात गाजत होता तेंव्हा शहाजी महाराजांचे वय 57 असावे.
शहाजी महाराज आधी निझाम बरोबर नंत्तर मुघल मग आदिलशाही परत निझाम आणि मग आदिलशाही कडे गेले.
मुर्ताजला गादीवर बसवून सर्व निझाम शाही त्यांना aaplyavtabyat ठेवली पण बाकीच्या आदिलशाही आणि मुघल एकत्र आले. त्यामुळे त्यांना पुन्हा आदिलशाहीचा मार्ग घ्यावा लागला.
शहाजी महाराजाचे मित्र रुस्तुम ए जमान रणदुल्लाखानाला आणि मुरार जगदेव मुळे शाहजी महाराज आदिलशाही मध्ये आले आणि स्थिरावले.त्यांच्याकडे कावेरी भागातली ही मोहीम सोपवली. नुकताच निजामशाहीतून आदिलशाहीत आलेले शहाजीराजे भोसले आणि रुस्तुम ए जमान रणदुल्लाखानाला यांना त्याच्या सोबतीस दिलं. या दोन्ही पराक्रमी सरदारांनी कृष्णा तुगभद्रेच्या पलीकडे आदिलशाही सैन्याला पोहचवल. अनेक छोट्या मोठ्या नायकांचा पराभव केला. म्हैसूर ताब्यात घेतलं. विजनगर चे अनेक छोटे राज्य विखुरलेले होते. त्यात केंपेगोवडाचा नायक कडून बंगलोर वसवले.
शहाजीराजांच्या प्रचंड दौऱ्यामुळे कर्नाटकातला एक बंगलोर आणि आसपास च भाग आदिलशाहीला जोडला गेला. रणदुल्ला खानाने आदिलशहाच्या सांगण्यावरून हा भाग शहाजीराजांना जहागीर म्हणून दिला. यात बंगळूर,कोलार, होसकट, दोड्डबल्लापुरा आणि सिरा ही गावे येत होती.
Comments
Post a Comment