निजामशाही

तिरप्या मुद्राक्षरातील मजकूर

अहमदनगर भुईकोटाचे शाईत चितारलेले रेखाचित्र (इ.स. १८८५)

अहमदनगराची निजामशाही ही मध्ययुगात दक्षिण आशियातील दख्खन प्रदेशात अस्तित्वात असलेली सल्तनत होती. २८ मे, इ.स. १४९० रोजी मलिक अहमद या जुन्नर येथील बहमनी सेनापतीने उर्वरित बहमनी सैन्याचा पराभव करून जुन्नर येथे स्वतंत्र सल्तनतीची घोषणा केली.

स्थापनासंपादन करा

इ.स. १४८६ साली निजाम-उल-मुल्क ह्या बहामनी सुलतानाच्या सरदाराची बिदर शहरात दरबारी हत्या झाली. ह्या प्रकारामुळे चिडलेल्या त्याच्या मुलाने - अहमदाने - बहामनी सल्तनीपासून फुटून स्वतंत्र राज्याची घोषणा केली आणि जुन्नर हे आपल्या राजधानीचे शहर निश्चित केले.

मे २८इ.स. १४९० रोजी अहमद निजाम-उल-मुल्काने बाग ह्या ठिकाणी झालेल्या युद्धात बहमनी सैन्याविरुद्ध संपूर्ण विजय मिळवला. त्याने आपल्या राज्याची राजधानी ह्या नव्या ठिकाणी हलवली आणि शहराचे अहमदनगर असे नामांतर केले.

पुढील जवळपास १४० वर्षे त्याच्या वारसांनी अहमदनगर येथून राज्य केले. चांद बिबी ह्या हुसेन निजामाच्या मुलीने आणि अली आदिलशाहाच्या पत्नीने १६ व्या शतकाच्या शेवटी मुघलांनी केलेल्या आक्रमणात अहमदनगराचा किल्ला लढवत ठेवला होता. मलिक अंबर हा कर्तृत्ववान प्रधान दुसऱ्या मूर्तझा निजामाच्या सेवेत होता.

घराणेसंपादन करा

या सलतनीच्या अधिकारारूढ सुलतानांना निजामशाह या किताबाने उल्लेखले जाई.

नावकार्यकाळ (इ.स.)
अहमद निजामशाह१४९० - १५०८
बुऱ्हाण निजामशाह१५०८ - १५५३
हुसेन निजामशाह१५५३ - १५६५
मूर्तझा निजामशाह१५६५ - १५८८
मिरान हुसेन१५८८ - १५८८
इस्माइल निजामशाह१५८८ - १५९०
दुसरा बुऱ्हाण निजामशाह१५९० - १५९५
इब्राहिम निजामशाह१५९५ - १५९६
दुसरा अहमद निजामशाह१५९६ - १५९६
बहादुर निजामशाह१५९६ - १६०५
दुसरा मूर्तझा निजामशाह१६०५ - १६३१

पुस्तकेसंपादन करा

  • आसिफजाही - निजाम राजवटीचा इतिहास - खंड १ (संपादक :- सरफराज अहमद, कलीम अजीम, सय्यद शाह वाएज)

Comments

Popular posts from this blog

मुघलांचा इतिहास तर माहिती आहे पण आदिलशाह आणि निजाम कोठून आले आणि दक्षिणेत त्यांनी आपले राज्य कसे प्रस्थापित केले?

अहमदनगरचा भुईकोट किल्ला

ख्वाजा गरीब नवाज का इतिहास