निजाम वंशाची स्थापना कशाप्रकारे झाली?

निजाम कोणता शिवपूर्वकालीन अहमदनगर चा की शाहू महाराजांच्या काळातील हैदराबाद चा.

शाहूकालीन निजाम हे अपेक्षित धरून उत्तर देतो.

माझ्या माहितीनुसार १६८७च्या दख्खन स्वारीत बादशहा औरंगजेबाच्या सैन्यातला चिन खालीच खान नावाचा सैनिक गोवळकोंडा किल्ल्यास घातलेल्या वेढ्यात जखमी होऊन मेला. चिन खालीच खानचा मुलगा नवाब गाझिउद्दीनखान हा औरंगजेबाचा पंतप्रधान सादुल्लाखानचा जावई होता. औरंगजेबाने नवाब गाझिउद्दीनखानचा मुलगा मीर क़मरुद्दीन यास औरंगजेबाने बालपणीच मनसब दिले होते. तरुणपणी त्याचे चिन फ़तेखान असे नामाभिदान केले. वयाच्या २६व्या वर्षी त्याला विजापूर आणि मावळचा सुभेदार बनवले नंतर संपूर्ण दख्खनची जबाबदारी त्यास दिली. औरंगजेबानंतर झालेल्या बादशहा फारुखसीयने त्यास निजाम उल मुल्क तर त्यानंतरच्या बादशहाने त्यास असिफ्जाह असे नाव दिले.

पण दिल्लीच्या बादशहानेच त्याला शह देण्याकरिता सन १७२४ मध्येएक लढाई घडवून आणली ज्यात मीर कमरुद्दीन खान चा विजय झाला आधिच कमकुवत झालेली दिल्लीची बादशाही मीर कमरुद्दीन ची प्रगती थांबवू शकली नाही.

अखेर इ.स. १७२४ मध्ये सुभेदार असलेल्या मीर कमरुद्दीन याने बंड करून स्वतः ला बादशहा घोषित करून निजाम वंशाची स्थापना केली.राजा रावरंभा निंबाळकर या मोठ्या शूर सरदाराच्या मदतीने त्याला महाराष्ट्रात सत्ता प्रस्थापित करणे सोपे गेले.

मीर कमरुद्दीन / निजाम उल मुल्क/असिफ्जाहने आधी आपली राजधानी औरंगाबाद येथे ठेवली व लवकरच हैदराबाद येथे हलवली. हे राज्य त्याच्या सात पिढ्यांनी इ.स. १७२४ ते इ.स. १९४८ या काळात उपभोगले.

या निजामाने सुरुवातीला प्रत्येक सत्ताधीश जसे की मराठे, नंतर इंग्रज, फ्रेंच यांच्याशी नरमाईचे धोरण अवलंबिले. कुठेही हार दिसली की हा तह करून मोकळा व्हायचा आणि खंडणी द्यायची वेळ आल्यावर नकार द्यायचा.

चौथाई फक्त कागदावरच दाखवायची असं याचं धोरण होतं. राज्य टिकवण्यासाठी आणि राज्य नवीनच असल्याने कुठं बंडखोरी होऊ नये म्हणून हिंदूंविषयी तो सहिष्णू राहिला. कारण त्याचे राज्य हे हैदराबाद बरोबरच आजचा मराठवाडा येथेही होते.

त्याच्या पुढील राज्य २१ मे १७४८ रोजीच्या त्याच्या निधनानंतर सत्तेच्या साठमारीत फ्रेंच व ब्रिटिशांनी वेगवेगळ्या वंशजाना पुढे करून परिस्थिती काही काळ अस्थिर ठेवली. नसीरजंग, मुज्जफरजंग, सालाबाथजंग आणि निझाम अली यांनी १३ वर्षे जम बसवण्याचा प्रयत्न केला. त्यात निझाम अली १७६३मध्ये निझाम झाला व नंतरची ४० वर्षे त्याने राज्य केले. हैदराबाद संस्थानात २२४ वर्षे राज्य करणारे घराणे समरकंद या मध्य आशियातील शहरातून आलेले, मुळात बगदादचे होते.

इ.स. १९०२ -०३ यानंतर च्या निजामांनी मात्र हिंदू सहिष्णू धोरण अलगदपणे बाजूला सारले आणि नंतर सूरु झाला हैद्राबाद आणि मराठवाड्यातील हिंदूंवर अनन्वित अत्याचार आणि छळ. हिंदूंनी सण सार्वजनिक पातळीवर साजरे करू नये, घरातील पूजेचा आरतीचा आवाजही बाहेर येऊ नये, नवीन मंदिरं बांधू नये. हे नी असे अनेक बंधनं हिंदूंवर लादण्यात आली.

शेवटचा निजाम मीर उस्मान अली खान हा होता. अत्यंत क्रूर अत्याचार याच्याच काळात झाले. तत्कालीन जगात सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून याला संबोधले गेले.

संस्थान विलीनीकरणाला याचा विरोध होता. याला पाकिस्तान सारखं स्वतंत्र राष्ट्र हिंदुस्तानच्या पोटात निर्माण करायचं होतं. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे हैद्राबाद आणि मराठवाड्यावर लाख उपकार आहेत ज्यांच्या धमकीने आणि लष्कर कारवाईने हा निजाम शरण आला होता.

१९२७ - २८ मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिममीन (All India Majlis-e-Ittehadul Muslimeen) म्हणजेच आजची ( M.I.M.) ही संघटना याच निजामाच्या मदतीने सुरू झालेली. या संघटनेच्या सभासदांना रझाकार असे म्हणल्या जात असे हे रझाकार इतके जुलमी होते की जनता यांच्या नावानेच कापायची. रझाकार हे निजामाचं लष्कर होतं यांच्या जीवावर तो उड्या मारायचा. या संघटनेचा म्होरक्या होता कासीम रिझवी अत्यंत कडवा सैनिक. १७ सप्टेंबर १९४८ साली भारतीय लष्कराने केलेल्या पोलीस कारवाईत निजाम शरण आल्यावर कासीम रिझवीला अटक झाली. नंतर सुटल्यावर तो कायमचा पाकिस्तानात गेला. पण जाण्यापूर्वी संघटनेची सूत्र वकील अब्दुल वहाद ओवैसी याच्याकडे दिली, पुढे ही संघटना पक्षात बदलली आणि याच्याच घराण्यात पक्षाची सुत्रे राहिली.

माझे चुलत आजोबा कै.स्वातंत्र्य सैनिक सखाराम पाटील पेरे हे तत्कालीन निजामाच्या रझाकारांविरोधात लढले होते. त्यांच्यामुळेच आमच्या परिसरातील अनेक हिंदूंचा जीव वाचल्याचे जुने लोक सांगतात.

धन्यवाद !

Comments

Popular posts from this blog

मुघलांचा इतिहास तर माहिती आहे पण आदिलशाह आणि निजाम कोठून आले आणि दक्षिणेत त्यांनी आपले राज्य कसे प्रस्थापित केले?

अहमदनगरचा भुईकोट किल्ला

ख्वाजा गरीब नवाज का इतिहास